महत्वाच्या बातम्या

 १९ जानेवारी ला विधी सेवा महाशिबीराचे आयोजन


-  शासकीय योजनांचा महामेळावा

-  विकास भवन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे शिबिर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा व जिल्हा प्रशासन वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने १९ जानेवारी ला २०२५ सकाळी १० वाजता विकास भवन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे विधी सेवा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या महामेळाव्याचा मुख्य हेतु महिलांचे सशक्तीकरण हा असून त्या व्यतिरिक्त समाजातील इतर दुर्बल, वंचित घटकांना शासकीय कार्यालयातील विविध लोककल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करणे तसेच त्याचा लाभ मिळविण्यासाठी कायदेविषयक मदत करणे हा शिबिराचा उद्देश आहे. वर्धा जिल्ह्यातील अनेक विविध शासकीय व निम शासकीय विभागाद्वारे त्यांच्या कार्यालयाकडून राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्याकरीता महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा व लोकांमध्ये शासकीय योजनेची जनजागृती व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा यांच्या आदेशानुसार वर्धा जिल्ह्यात विधी सेवा महाशिबीराचे आयोजन (शासकीय योजनाचा महामेळावा) १९ जानेवारी २०२५ ला सकाळी १० वाजता विकास भवन गांधी चौक, सेवाग्राम रोड, वर्धा येथे करण्यात आले आहे.

उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपूर तथा वर्धा जिल्ह्याच्या पालक न्यायमुर्ती उर्मिला जोशी-फलके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. वर्धा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, संजय जु. भारुका, यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची वाटचाल पूर्ण होणार आहे. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलीस अधिक्षक अनुराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान व वकीस संघाचे अध्यक्ष सुशांत राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाशिबीर होणार आहे.

जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी महाशिबीराला उपस्थिती दर्शवून शासकीय योजनांबाबत माहिती करुन घ्यावी व शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संजय भारुका, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विवेक देशमुख यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos