चंद्रपूर जिल्ह्यात पाच वर्षात दारूबंदी अंतर्गत ३९ हजार ६७२ गुन्हे दाखल, ४३ हजार ५९३ आरोपींना अटक तर कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्ह्यात एप्रिल २०१५ पासून दारूबंदी करण्यात आली. परंतु अवैध मार्गाने जिल्ह्यात मोठ्या  प्रमाणात दारू आली. या अवैध दारूला रोखण्यासाठी  पोलिस विभागानेही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या तसेच कारवाई केली. २०१५ ते मे २०२० या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी अंतर्गत तब्बल ३९ हजार ६७२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ४३ हजार ५९३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२०१५ मध्ये ५ हजार ४८७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ६ हजार ७८७ आरोपींना अटक करण्यात आली. ८  कोटी ९९ लाख ४६ हजार ४९८ रूपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. एकूण १३९४ वाहने जप्त करण्यात आली असून २८५ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. या वाहनांची एकूण किमत १० कोटी १६ लाख ३१ हजार रूपये आहे. तर ११०९ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून किंमत ३ कोटी २३ लाख ४७ हजार ५०० रूपये इतकी आहे. इतर घटकातून २५ लाख ४ हजार ६५० रूपये असा एकूण  २२ कोटी ६४ लाख २९ हजार ६४८ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२०१६ मध्ये ६ हजार ९४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये  ७ हजार ७३१  आरोपींना अटक करण्यात आली. १४  कोटी ४६  लाख ४६ हजार २५६  रूपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. एकूण १३८०  वाहने जप्त करण्यात आली असून ३६४  चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. या वाहनांची एकूण किमत १४  कोटी ९८  लाख ६५  हजार रूपये आहे. तर १०१६  दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून किंमत ३ कोटी ३८  लाख ९४५ रूपये इतकी आहे. इतर घटकातून ३७ लाख ३८ हजार ९४५  रूपये असा एकूण  ३३ कोटी २० लाख ५६ हजार ३०१ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२०१७  मध्ये ९ हजार ५०  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये  ९ हजार ८६०   आरोपींना अटक करण्यात आली. २४   कोटी ५३  लाख ६२ हजार ७६७   रूपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. एकूण  १८०६  वाहने जप्त करण्यात आली असून ४३४   चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. या वाहनांची एकूण  किमत १८  कोटी ८७   लाख ५४   हजार रूपये आहे. तर १३७२   दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून विंâमत ५ कोटी ४७   लाख ९० हजार ८५० रूपये इतकी आहे. इतर घटकातून ७ कोटी ६६ लाख ६८  हजार ३६९   रूपये असा एकूण  ५६  कोटी ५५ लाख ७५ हजार ९८६  रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२०१८  मध्ये ८ हजार ४७९  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये  ९  हजार ४४०  आरोपींना अटक करण्यात आली. २३  कोटी २०   लाख ५२  हजार ६३२  रूपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. एकूण  १६४४  वाहने जप्त करण्यात आली असून ४३१  चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. या वाहनांची एवूâण किमत १९  कोटी ३४ हजार रूपये आहे. तर १२१३  दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून किंमत ४ कोटी ८६  लाख २२ हजार ५५० रूपये इतकी आहे. इतर घटकातून ८ कोटी ९०  लाख १८ हजार १६१  रूपये असा एकूण  ५५ कोटी ९७  लाख २७  हजार ३४३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२०१९  मध्ये ७ हजार २५८  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये  ८  हजार ८६   आरोपींना अटक करण्यात आली. २२  कोटी ५०  लाख ४१  हजार ९९५   रूपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. एकूण  १८००   वाहने जप्त करण्यात आली असून ४०७   चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. या वाहनांची एवूâण किमत १७  कोटी ६६  लाख  ६५  हजार रूपये आहे. तर १३९३  दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून किंमत ६ कोटी ८३   लाख ५ हजार ७५०  रूपये इतकी आहे. इतर घटकातून ५ कोटी २३  लाख ६६ हजार ८७५   रूपये असा एकूण  ५१  कोटी ४९  लाख ९  हजार ६२०  रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मे २०२० पर्यंत  २ हजार ४५८  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये  १ हजार ५९८  आरोपींना अटक करण्यात आली. ७  कोटी १५   लाख २०  हजार ६५८   रूपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. एकूण ५८२   वाहने जप्त करण्यात आली असून ९०   चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. या वाहनांची एकूण  किमत ४   कोटी ३१  लाख ७५  हजार रूपये आहे. तर ४९२  दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून किंमत २  कोटी १२   लाख १५ हजार ५५  रूपये इतकी आहे. इतर घटकातून २ कोटी ४१  लाख ७१ हजार ३९५  रूपये असा एकूण  १६  कोटी  ८२  हजार १३५  रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-06-21


Related Photos