सिमेंट - काॅंक्रीटच्या बांधकामादरम्यान केबल कटल्याने गडचिरोली शहरातील विद्युत पुरवठा दोन तास खंडित


- चौपदरी रस्त्याच्या कामामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त, कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा कारणीभूत, लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात सिमेंट- काॅंक्रीट चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या बांधकाम सुरू असताना आज, २० जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान स्थानिक चामोर्शी मार्गावरील नागपूर नागरी सहकारी बॅंकेच्या जवळ केबल कटल्याने या परिसरातील विद्युत पुरवठा तब्बत दोन तास खंडित झाला होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. संबंधित कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे चौपदरी रस्ता बांधकामादरम्यान वारंवार केबल कटत असल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गडचिरोली शहरात सिमेंट- काॅंक्रीटच्या चौपदरी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या रस्ता बांधकामामुळे अनेक ठिकाणी खोदकाम सुद्धा करण्यात येत आहे. रस्त्याचे बांधकाम करताना कुठे भूमिगत केबल आहेत काय याची संबंधित कंत्राटदार शहानिशा न करता खोदकाम करण्यास कामगारांना सांगत असल्याने यापूर्वी अनेकदा केबल कटत असल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आज, २० जून रोजी सायंकाळच्या सुमारास सुद्धा स्थानिक चामोर्शी मार्गावरील नागपूर नागरी सहकारी बॅंकेच्या जवळील विद्युत केबल कटले. त्यामुळे तब्बल दोन तास वीज पुरवठा खंडित झाला होता. यासंदर्भात वीज वितरण महामंडळाने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. नागरिकांना विजेसंदर्भात त्रास होऊ नये याची खबरदारी घेत विद्युत विभागाने युद्धा पातळीवर काम केल्याने या परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला. संबंधित कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळेच चौपदरी रस्ता बांधकामादरम्यान यापूर्वी अनेकदा वीज पुरवठा खंडित झाला होता. गडचिरोली शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून जबाबदार कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. यापुढेही कंत्राटदाराचा असा कारभार सुरू राहिल्यास नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौपदरी रस्ता बांधकामात कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा सुरू असतानादेखील लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-20


Related Photos