उत्तर प्रदेशमध्ये सापडला ८० लाख वर्षांपूर्वीचा हत्तीच्या जबड्याचा जीवाश्म


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मेरठ  :
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे संशोधकांना ८० लाख वर्षांपूर्वीचा जीवाश्म सापडल्याचे  वृत्त आहे. शिवालिक पर्वतरांगेतील जंगलामध्ये हा जीवाश्म सापडला असून तो एका हत्तीच्या जबड्याचा असल्याची माहिती मिळत आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शिवालिक पर्वतरांगेतील जंगलात संशोधनासाठी छुपे कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यातील एका चित्रणात संशोधकांना एक विशिष्ट पद्धतीचा दोन फूट लांब इतका दगड दिसला. त्यांना त्याचं कुतुहल वाटलं आणि त्या दगडाचा शोध घेण्यात आला. तेव्हा तो दगड एक वैशिष्ट्यपूर्ण असं जीवाश्म असल्याचा शोध त्यांना लागला.
हे जीवाश्म आताच्या आशियाई हत्तीचा पूर्वज असलेल्या स्टेगोडॉन नावाच्या प्राण्याचं आहे. स्टेडेगॉन हे प्राचीन काळचे हत्ती होते. त्यांचा आकार आताच्या हत्तीच्या तुलनेत मोठा होता. संशोधकांना सापडलेलं जीवाश्म म्हणजे याच हत्तीच्या पिल्लाच्या जबड्याच खालचा भाग आहे. त्यावरील जबड्याच्या आत असलेल्या लांब वळ्याही दिसत आहेत. अतिशय चांगली घनता असलेलं हे जीवाश्म पन्नास लाख ते 80 लाख वर्षांपूर्वीचं असावं, असा शोध लावण्यात आला आहे. या स्टेडेगॉनच्या सुळ्यांची वाढ दहा ते बारा फुटापर्यंत होऊ शकायची.
अशा प्रकारचं जीवाश्म सापडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही शिवालिक टेकड्यांमधील काला आम तसेच जम्मू येथील काही टेकड्यांच्या पायथ्याशी असे जीवाश्म सापडले आहेत.
  Print


News - World | Posted : 2020-06-20


Related Photos