स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत ३ चारचाकी वाहनासह २६ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर:
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आज २० जून रोजी ३ वाहनांमधून दारूसाठा जप्त करण्यात आला असून २६ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तळोधी येथील सोनु कटारे हा अविनाश नरखेडे रा. हिंगणघाट याच्या स्काॅर्पिओ वाहनाने सिंदेवाही येथील विरवा गावाजवळील बंद गोदामाजवळ देशी दारू आणूून मुल येथील नरसिंग अण्णा यास विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री दरम्यान विरवा गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. यावेळी एक स्काॅर्पिओ आणि दोन रिट्झ वाहन येताना दिसले. वाहनांना थांबवून वाहनातील इसम स्काॅर्पिओ वाहनातून दारू रिट्झ वाहनात टाकत असताना पोलिस पथकाने धाड टाकली. यावेळी एक इसम घटनास्थळी आढळून आला. त्याची विचारपूूस केली व वाहनांची झडती घेतली. वाहनात ९८ बाॅॅक्स देशी दारू आढळून आली. या दारूची किंमत ९  लाख ८० हजार रूपये आहे. लाल रंगाची रिट्झ गाडी क्रमांक एमएच ३३ ए १५७० किंमत ५  लाख रूपये, पांढऱ्या रंगाची रिट्झ गाडी क्रमांक एमएच ३१ सिए ३४६८ किंमत ५ लाख रूपये आणि स्काॅर्पिओ वाहन क्रमांक एमएच ३१ इके ०१९५ किंमत ७  लाख रूपये असा एकूण २६ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ओ.जी. कोकाटे यांच्या नेतृत्वात पोहवा धनराज खरकाटे, पोलिस शिपाई अमोल धंदरे, गोपाल आतकुलवार यांनी केली आहे.

 
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-06-20


Related Photos