सावली पोलिसांची गुरे तस्करांवर धडक कारवाई


- गुरांना कतलखान्यात नेत असलेल्या वाहनसह आरोपीस अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सावली : परिसरात काल १९ जून रोजी विभागीय गस्त दरम्याण पेट्रोलिंग करित असता गडचिरोली मुख्य मार्गाने सावलीकडे एका संशयीत वाहन येताना मिळुन आले दरम्यान त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात एकुण ५ नग लहान मोठे म्हैस व रेडे अवैध्यरित्या कत्तलीकरिता अतिशय निर्दयतेन जनावरे डांबुन वाहतुक करित असताना मिळुन आले असता वाहन चालक अरूण पैकाजी किनेकार (४२) रा निफंद्रा ता सावली, राजीत जाकीर कुरेशी (२३) धंदा मजुरी रा. बल्लारशा ता. बल्लारशा यांचे विरूध्द पोलीस स्टेशन सावली येथे कलम ५ ( अ ) ( १ ) (२) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ सुधारीत २०१५, सहकलम ११ ( १ ) ( ३ ) भारताच्या प्राण्यास निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनीयम १९६० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाहीमध्ये एकुण ३ नग लहान म्हैस प्रति नग १०,०००/ - रू . प्रमाणे एकुण ३० हजार रुपये , २ नग रेडे प्रति नग २० हजार रुपये एकुण ४० असा हजार रुपये, एक पांढऱ्या रंगाचा टर्बो टी ३५०० एस.एम.एल कंपनीचा छोटा एम.एच -३२ ए.जे- ०५७१ किमंत १२ लाख रुपये असा एकुण १२ लाख ७० हजार रुपयेचा मुददेमाल आरोपींकडून कडुन जप्त करण्यात आला असुन गुन्हयात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे .
सदर कार्यवाही सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार कुमारसिंग राठोड , पोहवा वसंता कोसनशिले, पो.शि. दिपक डोंगरे व चापोहवा नारायण सिडाम यांनी केली असुन पुढील तपास सावली पोलीस करित आहेत.
News - Chandrapur | Posted : 2020-06-20