कुरखेडा, कोरची, चामोर्शी, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड तालुके झाले कोरोनामुक्त : गडचिरोली जिल्हावासियांना मोठा दिलासा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या कामगार, विद्यार्थी व नागरिकांमुळे गडचिरोली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. मात्र उपचारानंतर कोरोना बाधित रुग्ण बरे  होत असल्याने दवाखान्यातून त्यांना डिस्चार्ज देत स्वगृही पोहचविण्यात येत आहे. आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा, कोरची, चामोर्शी, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड हे तालुके कोरोनामुक्त झाले असून इतर तालुक्यातील रुग्ण बरे होत असल्याने त्या तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ५२ कोरोना बाधित रुग्णांपैकी ४० जण कोरोनामुक्त झाले असून सध्या ११ जण सक्रिय कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. कुरखेडा तालुक्यातील ९ जण कोरोना बाधित आले असून ते सर्वच जण उपचाराने बरे झाले असल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तसेच कोरची तालुक्यातील १ पैकी १, चामोर्शी तालुक्यातील ४ पैकी ४, अहेरी तालुक्यातील ३ पैकी ३, एटापल्ली तालुक्यातील ८ पैकी ८, भामरागड तालुक्यातील ३ पैकी ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सिरोंचा तालुक्यातील १ जण कोरोना बाधित आढळून आला होता. मात्र जिल्ह्याबाहेर त्याचा मृत्यू झाला असून या तालुक्यात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसल्याने हा तालुका सुद्धा कोरोनामुक्त आहे. गडचिरोली तालुक्यात ८ जण कोनोरा बाधित आढळून आले. त्यापैकी ४ बरे झाले असून सध्या ४ जण सक्रिय कोरोना बाधित आहेत. आरमोरी तालुक्यातील ४ पैकी २ रुग्ण बरे झाले असून २ सक्रिय कोरोना बाधित आहेत. वडसा देसाईगज तालुक्यात १ जण कोरोना बाधित आढळून आला आहे. धानोरा तालुक्यातील ३ पैकी २ जण बरे झाले असून १ सक्रिय कोरोना बाधित आहे. मुलचेरा तालुक्यातील ७ पैकी ४ जण बरे झाले असून अजून ३ जण बाधित बाधित आहेत. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून आलेल्यांपैकी बरेचजण उपचारानंतर बरे होत आहेत. तसेच जिल्ह्यातील बहुतांशी कोरोना अहवाल निगेटीव्ह येत असल्याने गडचिरोली जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-17


Related Photos