कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला न सांगण्याचा मुंबई महापालिकेचा अजब फतवा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकडेवारी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुरघोडी सुरुच आहेत. राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत, मुंबईतील कोरोनाबाधितांचे आकडा ५० हजारांच्या वर पोहचला आहे. शहरातील मृतांच्या आकड्यात फेरफार केल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपाने महापालिकेवर केला होता.
त्यानंतर आता मुंबई महापालिकेने एक पत्रक काढून चाचणी केंद्रांना मार्गदर्शक सूचना दिली आहे. यामध्ये एखाद्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल तर ते रुग्णाला न कळवता थेट महापालिकेला कळवा असा अजब फतवा काढण्यात आला आहे. यावर मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी आक्षेप घेतला आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-06-17


Related Photos