वडसा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ; मुंबईहून आलेला एकजण कोरोना बाधित


- जिल्ह्यातील एकुण बाधित संख्या ५२; आत्तापर्यंत ४० डिस्चार्ज तर सक्रिय कोरोना बाधित ११
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
काल १६ जून रोजी रात्री वडसा तालुक्यातील नव्याने १ कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ११ झाली आहे . 
 वडसा येथील २६ वर्षीय युवकाला जिल्ह्यात आल्यानंतर वडसा येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. वाशी मुंबई येथून ६ जून ला एकूण २९ प्रवासी खाजगी बसने जिल्हयात वडसा येथे आले. त्यातील १० वडसा येथे विलगीकरणात ठेवण्यात आले. १७ धानोरा तालुक्यात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. तर उर्वरीत २ गोंदिया जिल्हयातील होते. त्यांना त्या ठिकाणी विलगीकरणात ठेवले आहे. 
यातील वडसा येथील १० पैकी एकाचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटीव्ह आल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पुढिल उपचारासाठी हलविण्यात आले आहे. उर्वरीत ९ तीव्र जोखमीच्या प्रवाशांना यापुर्वीच विलगीकरणात ठेवलेले आहे. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. 
मुंबईवरून खाजगी बसने आलेल्या वाहनाचा ड्रायव्हर त्याचवेळी मुंबईला परतला आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-17


Related Photos