गडचिरोलीत दिल्लीहून आलेल्या दोन व चंद्रपूर वरून आलेल्या एका महिलेचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या झाली ५१


- आतापर्यंत ४० जण झाले कोरोनमुक्त 
विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यत मागील चार दिवस एकही नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण न आढळल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला होता मात्र आज १६ जून रोजी पुन्हा ३ नव्या रुग्णांची जिल्ह्यात भर पडली आहे. यामुळे जिल्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ५१  वर पोहचली आहे. तीनही नवे आढळलेले रुग्ण हे महिला असून त्यातील दोन महिला दिल्लीवरून तर एक महिला चंद्रपूर येथून प्रवास करून मुलचेरा तालुक्यात आलेले होते. जिल्ह्यात सध्या सक्रिय कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७ वरून आता १० झाली आहे . तर आतापर्यंत ४० कोरोनामुक्त झालेल्यांना यापुर्वीच दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. नव्याने आढळलेले महिला रुग्ण हे मुलचेरा तालुक्यातील असून ते १८ , २१ व ४० वयोगटातील आहे व त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-16


Related Photos