महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखाच्या वर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर ९६ दिवसांत करोना बाधित रुग्णांची संख्या एक लाखावर पोहचली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात करोनाच्या ३ हजार ४९३ नवीन रुग्णांची भर पडली आणि एकूण रुग्णसंख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झाली. यासोबतच देशातील करोनाग्रस्त राज्यांत महाराष्ट्र पहिल्या स्थानी असून त्याखालोखाल तामिळनाडूत करोनाचे रुग्ण आहेत. तेथील रुग्णसंख्या ५० हजारच्या उंबरठ्यावर आहे.
महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण आजपासून ९६ दिवसांपूर्वी पुण्यात आढळला. पुण्यातील एक दाम्पत्य दुबईतून परतलं होतं. या दाम्पत्याला करोनाची लागण झाली. त्यानंतर राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यात करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या शुक्रवारी दिवसअखेर १ लाख १ हजार १४१ इतकी होती. चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्र हा देश असता तर करोना बाधित देशांमध्ये राज्याचा क्रमांच १७वा लागला असता. कॅनडा आणि चीनमध्ये आढळलेल्या करोना रुग्णांपेक्षाही अधिक रुग्णसंख्या सध्या महाराष्ट्रात आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-06-13


Related Photos