गट्टा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत नक्षल्यांकडून इसमाची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी: एटापल्ली उपविभागातील गट्टा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोठी मार्गावर नक्षल्यांनी एका इसमाची हत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मृतक इसम गुंडूंजूूर येथील रहिवासी असून त्याचे नाव पुंगाटी असल्याची माहिती मिळाली आहे. नक्षल्यांनी त्याची हत्या का केली याबाबत अधिकृतरित्या माहिती मिळू शकलेली नाही.
News - Gadchiroli | Posted : 2020-06-12