गडचिरोली जिल्हयातील आणखी एकजण झाला कोरोनामुक्त, आतापर्यंत एकूण ३७ जणांना दवाखान्यातून मिळाली सुट्टी


- कोरोना महामारीने धास्तावलेल्या गडचिरोली वासियांना मिळाला मोठा दिलासा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज, ११ जून रोजी जिल्हयातील आणखी एकाने कोरोनावर मात केल्याने त्याला दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली. घरी सोडण्यात आलेला कोरोनामुक्त चामोर्शी तालुक्यातील रहिवाशी आहे. जिल्हयातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. त्यामुळे कोरोना महामारीने धास्तावलेल्या गडचिरोली जिल्हा वासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. सद्या ९ कोरोना बाधितांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्हयात ४७ कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-11


Related Photos