गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी, आरोग्य सेविका व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याची महासंघाची मागणी


-  राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंचाचे जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन सादर

- शासन सेवेत नियमित सामावून न घेतल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा महासंघाचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी :
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने अधिकारी, अधिपरिचरिका व कर्मचारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला अविरत सेवा देत असून सुद्धा आजपर्यंत शासनसेवेत कायम न केल्याने बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांची आज महासंघाच्या आरोग्य सेविकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन कंत्राटी अधिकारी, आरोग्य सेविका व कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात शासन सेवेत नियमित करण्याची मागणी करीत निवेदन सादर केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील ग्रामीण व अतिसंवेदनशील भागात मागील दहा ते बारा वर्षांपासून जनतेची सेवा प्रामाणिकपणे करीत जिल्ह्यात बालमृत्यू दर नियंत्रणात आणले. सध्या कोविड -१९ आजाराची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात आरोग्य परिस्थितीची बिकट परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभागातील अनेक विभागात अनेक पदे रिक्त आहेत. जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन देत कंत्राटी आरोग्य सेविकांना शासन सेवेत कायम सामावून न घेतल्यास नाईलाजास्तव बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांनी कंत्राटी अधिकारी, आरोग्य सेविका व कर्मचाऱ्यांच्या निवेदन दखल घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा करून शासन सेवेत सामावून घेण्यासाठी पुढाकार घेऊन योग्य सहकार्य करण्याची विनंती महासंघाने केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-11


Related Photos