साखरी माल येथे जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सावली वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द  उपक्षेत्र बीटातील कक्ष क्र १५३४ अंतर्गत साखरी माल येथे  जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यु झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
शेताची नासधुस करत असलेल्या डुकरांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी रानटी डुकरांची शिकार करण्याकरिता सापळा सुरु केला आहे. याकरिता माजी वनमंत्र्यानी मूक संमती दिली होती. तेव्हापासून आतापर्यंत सुरूच आहे. अशाप्रकारचे रानडुकरांची शिकार करण्यासाठी जाळे लावण्यात आले होते. या जाळ्यात साडेतिन वर्षीय बिबट अडकून आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास मृत्युमुखी पडला.
या संदर्भात सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जि.व्ही.धाडे, व्याहाड खुर्दचे क्षेत्रसहायक डब्ल्यू.एन.बुराडे, वनसहायक चौधरी व सहकारी पुढील तपास करीत आहेत.
मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून पशुवैद्यकीय अधिकारी व वन्यप्राणीमित्रांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-06-10


Related Photos