वर्धा जिल्ह्यात ३ नवीन कोरोनाबाधित रुग्णाची नोंद : एकूण रुग्णसंख्या झाली १३


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
जिल्ह्यात आज प्राप्त अहवालात आणखी ३ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. हे तीन रुग्ण वर्धमनेरी आणि सिंदी रेल्वे येथील रुग्णांच्या निकट संपर्कातील आहेत.
वर्धमनेरी येथील ५९ वर्षीय पुरुषाच्या संपर्कातील ४५ वर्षीय पत्नी आणि २१ वर्षीय मुलगी या दोघींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  तसेच सिंदी रेल्वे येथील कोरोना बाधित रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोबत काम करणारे  रामनगर रहिवासी ५९ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. 
आजच्या तीन कोरोना बाधित रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १३  झाली आहे.
  Print


News - Wardha | Posted : 2020-06-09


Related Photos