दिलासादायक : गडचिरोली जिल्हयातील पुन्हा दोघा जणांनी केली कोरोनावर मात


- सध्या १० जणांवर उपचार सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हयातील आणखी दोन कोरोनाबाधित रूग्ण आज ९ जून रोजी बरे झाले आहे. तर सध्या १० जणांवर दवाखाण्यात उपचार सुरू आहे. सदर बरे झालेले रूग्ण हे गडचिरोली येथील दांम्पत्य असून ते गुजराथ येथून आले असता त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. तर आतापर्यंत जिल्ह्यातील  एकुण ३३ रूग्ण बरे होउन घरी परतले आहे. काल पर्यत जिल्हयातील कोरोनाबाधीतांची संख्या ४४ होती तसेच तसेच  काल ८ जून रोजी ४ रूग्ण बरे होउन घरी परतले व आज ९ जून रोजी पुन्हा २ रूग्ण बरे झाल्याने आता जिल्हयातील सक्रीय रूगणाची संख्या १० झाली आहे.  दिवसेंदिवस कोनानाचे रूग्ण बरे होत असल्याने जिल्हा वासियांना दिलासा मिळत आहे. सदर रूग्णांना डिस्चार्ज देतांना जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल रूडे उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-09


Related Photos