रांगी येथे झाडावरुन पडलेल्या इसमाच्या पोटातून आरपार निघाला कुंपनाचा मेळा, गंभीर जखमी झाल्याने हलविले गडचिरोलीला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / रांगी :
धानोरा तालुक्यातील रांगी येथिल दिनकर टेकाम हा युवक चिंचेच्या झाडावर फांद्या तोडायला गेला असता अचानक तोल जावून खाली पडून जखमी झाल्याची घटना घडली. झाडावरून तो कुंपणावर पडल्याने  कुंपनाचा मेळा त्याच्या पोटातून आरपार निघाला. रांगी येथिल रहीवासी असलेला दिनकर हिरासिंग टेकाम (४२) हा युवक आज, ६ जूनला सकाळी १० वाजता अंताराम हलामी (ताडाम टोला) रांगी यांच्या घरासमोरील चिंचेच्या झाडावरील फांद्या तोडण्याकरिता चढला व नंतर काही फांद्या तोडत असताना तोल गेला आणि खाली मेळ्याचा कंपाउन्डवर पडल्यामुळे लाकडी मेळा पोटातून आरपार निघाला. त्यानंतर मेळ्याला कापुन रांगी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. त्याची प्रकृती लक्षात घेवून त्याला गडचिरोलि येथिल दवाखाण्यात हलविण्यात आले असून डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-06


Related Photos