वर्धा जिल्ह्यातील एका व्यक्तीचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या ९


-  दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील सर्व रुग्ण झाले होते कोरोनामुक्त 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. शिवाय मागील ६ दिवसांपासून जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. परंतु आज प्राप्त अहवालात आर्वी तालुक्यातील वर्धामनेरी येथील ५२ वर्षीय पुरुष  कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ९ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण १ आहे.
सदर व्यक्तीचा मुलगा दिल्लीला यु पी एस सी परीक्षा तयारीसाठी राहत  होता. तो १९ मे ला दिल्लीवरून परत वर्धमनेरी येथे आला. तसेच मुलगी १ महिन्यापूर्वी  नागपूरहून परत आली होती. त्यानंतर  पूर्ण कुटुंब गृह विलगिकरणात होते. त्यांचा गृह विलागीकरण कालावधी १ जून रोजी समाप्त झाला.
कोरोनाबाधित व्यक्तीला ताप, खोकला, आणि पचनाचा त्रास जाणवत होता. ४ तारखेला सदर व्यक्तीच्या घशातील स्त्राव  नमुना तपासणीला पाठविण्यात आला होता. आज प्राप्त अहवालात त्यांचा कोरोना चाचणी अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे.
तसेच त्यांच्या निकट संपर्कातील तीन व्यक्तीना आर्वी उपजिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वार्ड मध्ये दाखल करण्यात आले आहे.
  Print


News - Wardha | Posted : 2020-06-06


Related Photos