महत्वाच्या बातम्या

 साहित्य संमेलनात वंचिताचे साहित्य आणि लोकशाही या विषयावर परिसंवाद


- मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून परिसंवाद तयारी आढावा
- मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करणार परिसंवादाचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात साहित्य महामंडळ आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 5 फेब्रुवारी रोजी वंचिताचे साहित्य आणि लोकशाही या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे उद्घाटन उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याच्याहस्ते होणार आहे.
परिसंवादाच्या अनुषंगाने पुर्वतयारीबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा घेण्यात आला. बैठकीला वर्धा येथून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, तहसिलदार रमेश कोळपे तर मुंबई येथून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील स्वीप टीमचे समन्वयक उपस्थित होते.
साहित्य संमेलनाच्या सभामंडपात 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता यादरम्यान हा परिसंवाद होईल. सदर परिसंवादाचे उद्घाटन जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणारे बीएलओ यांना आपल्या कामातून उद्घाटनाचा मान मिळणार आहे. सदर परिसंवादासोबतच मतदार जागृती दालन उभे करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 दालने आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये भारत निवडणूक आयोगाची पुस्तके, लोकशाही समजून घेताना आणि कशासाठी? लिंगभाव समतेसाठी ही पुस्तके ठेवली जाणार आहे. सोबतच मतदार नोंदणी केंद्र व मतदार जनजागृती खेळ देखील राहणार आहे.
दालनाच्या परिसरात लोकशाही भिंत देखील उभी करण्यात येणार आहे. भिंतीसाठी वापरण्यात येणारा काही मजकुर हा बोलीभाषेत भाषांतरीत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मतदार नोंदणी होणाच्यादृष्टीने जनजागृती या माध्यमातून करण्यात येणार आहे. परिसंवाद दरम्यान जिल्ह्यातील मतदारांची जनजागृती होण्याच्यासाठी समाजमाध्यम कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. परिसंवादाच्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
साहित्य संमेलनातील परिसंवाद आणि मतदार जनजागृती दालन यांच्या तयारीच्या अनुषंगाने विविध नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या सुचना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिल्या. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने पूर्वतयारी नियोजन करण्यात येत असल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos