चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा आढळला एक कोरोना बाधित रुग्ण : कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पोहचली २७ वर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. परराज्यात आणि बाहेर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले जिल्ह्यातील नागरिक, कामगार जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे बधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आज, ५ जून रोजी चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २७ वर पोहचली आहे. आज नव्याने आढळलेला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण चंद्रपूर महानगरातील भिवापूर वॉर्ड परिसरातील ६२ वर्षीय व्यक्ती आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यातील २७ पैकी ५ ॲक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण आहेत.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-06-05


Related Photos