महत्वाच्या बातम्या

 संघामध्ये समाज निर्माण करण्याची ताकद आहे : विभाग प्रचारक अश्विन जयपूरकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस    

प्रतिनिधी / आष्टी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात झाली. समाज मन निर्माण करण्यासाठी स्वयंसेवक कार्य करीत असतो. समाज हा माझा आहे आणि समाजाची सेवा करण्यासाठी स्वयंसेवक सदैव तत्पर असतो. देशाचे भाग्य बदलण्याचे सामर्थ्य सज्जन शक्तिमध्ये आहे. म्हणून संघामध्ये  समाज निर्माण करण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन संघाचे विभाग प्रचारक अश्विन जयपूरकर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा आष्टी तर्फे येथील राम मंदिराच्या पटांगणात आयोजीत दसरा उत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी मंचावर नरहरी श्रीरामवार, जिल्हा सहकार्यवाह समय्या बेजनींवार, तालुका कार्यवाह प्रा.डॉ. भारत पांडे उपस्थित होते.     

पुढे बोलतांना जयपूरकर म्हणाले समाजमन उभे करण्यासाठी गावागावात संघाच्या शाखा सुरु झाल्या पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडे बघताना मनुष्य म्हणून बघा . संघाचे कार्य वाढविण्यासाठी स्वयंसेवकांनी तत्पर असावे दसरा उत्सवा निमित्ताने प्रमुख पाहुण्यांचे हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले. त्यानंतर योग व्यायाम घेण्यात आला. याप्रसंगी गावातून संघाचे पथसंचालन करण्यात आले. डॉ. सारंग कत्रोजवार यांनी सांघिक गीत सादर केले. सुधीर फरकाडे यांनी सुभाषित तर रुपेश मुत्येवार यांनी अमृतवचन सादर केले. निलेश कोहळे यांनी वैयक्तिक गीत सादर केले. योग संचलन व कार्यक्रमाचे संचालन करण लोणारे यांनी केले. प्रार्थना व ध्वज प्रणाम करुन कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. याप्रसंगी जवळपास संघाचे ६० स्वयंसेवक उपस्थित होते.






  Print






News - Gadchiroli




Related Photos