चामोर्शी येथील विकासकामांबाबत युवकांनी केली नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा, मागण्यांचे निवेदन केले सादर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चामोर्शी :
येथील विकासकामे, शहरातील समस्या, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात नगरपंचायत प्रशासनानाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील युवकांनी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यांशी चर्चा केली व विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. घरकूल, सिटी सर्वे, शहरातील अतिक्रमण धारकांना पट्टे, घनकचरा व नालेसफाई, गावतलाव व नाल्यातील जलपर्णी वनस्पतीचे निर्मुलन, गावतलावावर गेट बसविणे व ईतर विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना सादर करण्यात आले. मुख्याधिकारी यांनी सदर सर्व विषय महत्वाचे असून कोरोना काळातही या विषयावर तत्काळ स्वत: लक्ष घालून या समस्या दूर करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले. यावेळी प्रामुख्याने आशीष पिपरे, गोपाळ चिचघरे, वासुदेव चिचघरे, मुकेश सातपुते, रोशन गडकर, संतोष बुरांडे, अनिल बोदलकर उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-03


Related Photos