कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी गडचिरोली नगर परिषदेत घेतली आढावा बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरोना विषाणूचा संसर्ग होउ नये याकरिता येथील नगर परिषदेत आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा योगिता पिपरे होत्या. या बैठकीत कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत मुख्याधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली. तसेच नगर परिषद क्षेत्रात पावसाळ्यात उद्भवणारया समस्यांवर चर्चा करून त्यावर प्रतिबंध घालण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, आरोग्य विभाग प्रमुख भरडकर, शहर समन्वयक तृप्ती मल, मधुमटके, कंत्राटदाराचे व्यवस्थापक पंकज सोमनकर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-03


Related Photos