गडचिरोली जिल्ह्यात २ जूनपर्यंत ३८ जण आढळले कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण : १२ जणांना मिळाला डिस्चार्ज, २३४० पैकी २०९४ नमुने कोरोना निगेटीव्ह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
भारतासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असून आता गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या जिल्हयातील काही क्षेत्र कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज, २ जूनपर्यंत ३८ जण कोरोना पॉझिटीव्ह  आहेत. यापैकी आज २ जण बरे झाले आहेत. आतापर्यंत १२ रुग्ण बरे झाले असून प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज देत रुग्णवाहिकेने त्यांच्या त्यांच्या घरी रवाना केले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे धास्तावलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २३४१ कोरोना संशयित रुग्ण आहेत. अजून ४६१ जण निरीक्षणाखाली असून त्यापैकी २६ जण दवाखान्यात आहेत. आज ३४२ जणांना संस्थात्मक विलगीकरणात घेण्यात आले आहे. एकूण २३४० जणांचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी २०९४ नमुने कोरोना निगेटीव्ह आले आहेत. अजून २४६ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. आज ३४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सद्या २६ कोरोना सक्रिय असलेले रुग्ण आहेत. जिल्ह्यातील सक्रिय प्रतिबंधात्मक क्षेत्र १० आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेत अत्यावश्यक कामे वगळता घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-02


Related Photos