लॉकडाऊन ५ : गडचिरोली जिल्हयात सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू राहणार


- पूर्वीप्रमाणे रविवारला दुकाने राहणार बंद, इतर जिल्हयात जाण्यासाठी घ्यावी लागणार परवानगी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आजपासून लाॅकडाउनच्या पाचव्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. याबाबत गडचिरोली  जिल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी काल ३१ मे रोजी सुधारीत आदेश जारी केले आहे. पुर्वी जिल्हयातील सर्व दुकाने सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती यामध्ये बदल करून आता जिल्हयातील सर्व दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते दुपारी ४ वाजता पर्यंत सुरू ठेवण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. तसेच पूर्वीप्रमाणे रविवारला सर्व दुकाने बंदच राहतील.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशामध्ये काय सुरू आणि काय बंद असणार याबाबत दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे.

काय सुरू राहणार - सर्व रूग्णालये, पॅथाॅलाजी सेेंटर, सोनाग्राफी सेंटर, औषधी विक्री दुकाने, केमिस्ट यांनी वेळेचे बंधन राहणार नाही. आॅटो रिक्शा व सायकल रिक्शामध्ये १ चालक व २ प्रवासी यांप्रमाणे वाहतूक करण्यास परवानगी. खते, किटकनाशके व बी बीयाने यांच्याशी निगडीत उत्पादन व पॅकेजींग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग, अस्थापना, दुकाने, बसेस, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी सुरू राहील.

काय राहणार बंद - विना परवाना आंतरराज्य, एका जिल्हातून दुसऱ्या जिल्हयात प्रवास, सर्व शैक्षणिक,प्रशिक्षण संस्था, सलुन, केस कर्तनालय, सर्व चित्रपटगृहे, माॅल्स, खरेदी संकुले, व्यायमशाळा , क्रिडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, धार्मीक स्थळे व प्रार्थनास्थळे, पानटपरी, तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारी दुकाने आदी. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-01


Related Photos