राज्यात २४ तासात ९१ पोलिसांना करोनाची बाधा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यात करोनाचा कहर वाढत असताना पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेगणिक वाढतच आहेत. मागील चोवीस तासात ९१ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. शनिवारपर्यंत करोनाबाधित पोलिसांचा आकडा २ हजार ४१६ पर्यंत पोहचला आहे. तर, आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात करोनाबाधित पोलिसांमध्ये १८३ अधिकारी आणि १ हजार २३८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मागील २४ तासांत ९१ पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. करोना संसर्गामुळं मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये १६ पोलिस मुंबईतील, तीन नाशिक व दोन पुण्यातील असून प्रत्येकी एक सोलापूर, ठाणे आणि मुंबई पोलिसांच्या एटीएस शाखेतील आहेत. या आठवड्यात दररोज १०० हून अधिक पोलिस अधिकाऱ्यांना संसर्ग होत असल्याचं पोलिस दलातील अधिकाऱ्यानं म्हटले  आहे.

 
  Print


News - Rajy | Posted : 2020-05-31


Related Photos