दिलासादायक : गडचिरोली जिल्ह्यातील पुन्हा तिघेजण झाले कोरोनामुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत तर अशातच दिलासादायक बातमी सुद्धा सामोर येत आहे. आज जिल्ह्यातील पुन्हा ३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे आता जिल्ह्यातील अक्टिव्ह रुग्णसंख्या २५ वर पोहचली आहे.
या अगोदर जिल्ह्यातील ५ रुग्ण बरे होऊन घरी परतले त्यानंतर पुन्हा रुग्ण संखे मध्ये वाढ झाली. आज ३० मे रोजी दुपारी १ वाजता गुजरात येथून आलेल्या एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३३ वर पोहचली तर अक्टिव्ह २८ रुग्ण होते. पुन्हा आज ३ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने अक्टिव्ह रुग्ण संख्या आता २५ वर पोहचली असून त्यावर उपचार सुरू आहे. बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांमध्ये आरमोरी तालुक्यातील १ तर कुरखेडा तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांना प्रमाणपत्र देण्यात आले. 
यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हाधिकारी दीपक सिंगला,  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रूडे व इतर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.हे तीनही रुग्ण आज त्यांच्या त्यांच्या घरी रुग्णवाहिकेने रवाना झाले. त्यांना आता यापुढे सात दिवस गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुढील सात दिवस आरोग्य विभागाकडून त्यांच्या घरीच त्यांच्या लक्षणांबाबत निरीक्षणे नोंदवली जाणार आहेत.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-30


Related Photos