गुजरात येथून आलेल्या एकाचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या पोहचली ३३ वर , नवा रुग्ण गडचिरोली तालुक्यातील


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात आज ३० मे रोजी दुपारी १ वाजता पुन्हा एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३ वर पोहचली असून यातील ५ जण बरे होऊन घरी परतले आहे तर  सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २८ आहे. नव्याने अहवाल आलेला रुग्ण हा गुजरात येथून आला असून तो गडचिरोली तालुक्यातील आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सदर रुग्णाला गडचिरोली येथील संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले होते असे आरोग्य विभागाने कळवले आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर  पडू नये असे सातत्याने गडचिरोली आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-30


Related Photos