क्रेन कोसळून मेडीगट्टा प्रकल्पातील एका मजुराचा मृत्यू : सहा मजूर झाले गंभीर जखमी, इतर जखमी मजुरांवर उपचार सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी :
महाराष्ट्र राज्यातील तेलंगणा सीमेवरील सिरोंचा शहर मुख्यालयापासून ५ किमी अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्याच्या कालेश्वर येथील मेडीगड्डा प्रकल्पाच्या कन्नेपल्ली पंप हाऊसमध्ये २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता अचानक क्रेन कोसळून सिरोंचा तालुक्यातील प्रकल्पाच्या कामावर असलेल्या एका मजुराचा मृत्यू झाला असून सहा मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मेडीगट्टा प्रकल्पात काम करणाऱ्या इतर मजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तेलंगणा सरकारच्या या महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाच्या पंप हाऊसमध्ये काम सुरु असताना क्रेनची साकळी तुटल्याने सातही मजूर १०० ते १५० फुट खाली फेकल्या गेले. त्यांना तत्काळ माहादेवपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वरंगल येथील एम. जी. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून खाली फेकल्या गेलेल्या सातही मजूर गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असताना आज, २९ मे रोजी सिरोंचा तालुक्यातील बोरमपल्ली या गावातील तिरुपती दुर्गम (२५) याचा मृत्यू झाला आहे. हे सगळेच मजूर गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील बोरमपल्ली, पेंटीपाका, गर्कापेठा या गावातील रहिवासी असून उर्वरित मजुरांची प्रकृती गंभीर असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-29


Related Photos