गडचिरोली शहरातील धानोरा मार्गावरील सेतू केंद्राला अचानक लागली आग : लाखो रुपयांचे झाले नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील धानोरा मार्गावरील डॉ. अप्पलवार यांच्या दवाखान्याच्या बाजूला व रामायण हॉटेलच्या वर असलेल्या सिलिकॉन मल्टी सर्व्हिस तथा सेतू केंद्राला काल, २७ मे रोजी रात्री ११ वाजता अचानक आग लागून दुकानातील ३ लॅपटॉप, २ डेस्कटॉप, ४ प्रिंटर, १ आधार मशीन, १ झेरॉक्स मशीन असा संपूर्ण सामान जाळून राख झाला. तसेच यात २ किमी लांबीचा फायबर केबल सुद्धा जळाले. यामध्ये केवळ OTDR मशीन वाचवता आली. परंतु यात ग्राहकांचे ओरिजनल कागदपत्रे तथा झेरॉक्स प्रति सुद्धा जळून खाक झाले. यात दुकान मालकाचे अंदाजे ४ लाखांपर्यंत नुकसान झाल्याचे कळते. रात्रो ११ वाजताच्या सुमारास आग लागल्याचे शेजाऱ्यांना कळताच त्यांनी दुकान मालकांना याबाबत माहिती दिली असता दुकान मालक घटनास्थळी दाखल झाले व आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत खूप सामान जळून खाक झाले होते. मो. शादाब शेख असे सदर सेतू केंद्र मालकाचे नाव असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-28


Related Photos