कोरोना लाॅकडाऊनमध्ये भामरागड पोलिसांनी जप्त केला १३ हजार ४५० रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
देशात व राज्यात कोरोना या विषाणूने हाहाकार माजविला असताना आणि शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार तंबाखूजन्यू पदार्थांवर बंदी घातली असताना सुद्धा तंबाखूजन्य पदार्थ बाळगत असल्याच्या गोपनीय माहितीवरून भामरागड पोलिसांनी धाड टाकून १३ हजार ४५० रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. या प्रकरणी भामरागड येथील किराणा दुकानदारावर कारवाई केली आहे. भामरागड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप भांड यांनी आपल्या स्टाफ व पंचासह मुसलमान टोला भामरागड येथील किराणा दुकानदार संतोष रामया मद्देर्लावार (४९) याच्या किराणा सामान ठेवलेल्या गोदामाची तपासणी केली असता गोदामात ईगल व इतर कंपनीचा १३ हजार ४५० रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू अवैधरित्या बाळगताना मिळून आला. सदर सुगंधित तंबाखूचे पाॅकेट पंचासमक्ष जप्त करण्यात आले असून अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांना सदर इसमावर पुढील कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्या कारवाईवरून गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवली आहे. सदर कारपाई गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अहेरीचे अप्पर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संदीप भांड, पोलिस उपनिरीक्षक मंगेश कराडे, पोलस शिपाई गितेश्वर बोरकुटे, गणेश मडावी, बेगलाजी दुर्गे, सचिन शिंदे, महिला पोलिस शिपाई तारा आत्राम, फुला मडावी यांनी केली आहे. या कारवाईमुळै सुगंधित तंबाखू बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-26


Related Photos