पवनी नगर परिषदेने होम क्वारंटाईन युवकावर केली दंडात्मक कार्यवाही : पाच हजार रुपयांचा आकारला दंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / पवनी :
चार दिवसापूर्वी वदिलांची प्रकृती बरी नाही कारणाने नागपूर येथून स्वगावी आलेल्या युवकाला होम क्वारंटाईन केले असतांनाही घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्याने पवनी नगर परिषदेने त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करत पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आले आहे. 
नागपूर येथे खासगी नोकरी करीत असलेला युवक पवनी येथे वास्तव्यास असलेल्या वडीलाला दम्याचा त्रास असल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेता यावे याकरिता  चार दिवसापूर्वी  स्वगावी परत आला. मात्र कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून सदर युवकाला होम क्वारंटाईन करण्यात आले. परंतु सदर युवक घराबाहेर फिरत असल्याने वार्डातील जनतेनी नगर परिषदेच्या लक्षात आणून देताच भरारी पथकाने त्वरीत जाऊन कार्यवाही करीत पाच हजार रुपयांचा दंड ठोटावला.
सदर कार्यवाही पवनी नगर परिषदेचे  मुख्याधिकारी रविंद्र ढाके यांचे  मार्गदर्शनात सुरज पिंपळकर, अजिंक्य पाटिल, संजय कोंढेकर, विजय सोनकुसरे, आरिफ शेख, राजेश चौटेल यांनी केली.
  Print


News - Bhandara | Posted : 2020-05-26


Related Photos