एटापल्ली येथील आणखी एकाचा अहवाल आला कोरोना पाॅझिटीव्ह : गडचिरोली जिल्ह्यातील रूग्णसंख्या पोहचली आता २४ वरून २५ वर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी गडचिरोली आज २५ मे रोजी दुपारी ३ वाजता आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २४ असतांनाच आता पुन्हा रात्रो ९ वाजता एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २४ वरून २५ झाली आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाची डोखेदुखी वाढलेली आहे. काल २४ मे रोजी रात्री १० वाजता दोघाचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला होता व आज २५ मे ला  दुपारी ३ वाजता पुन्हा 
मुंबई येथून आलेल्या ९ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला होता त्यामुळे जिल्हयातिल कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांची संख्या २४ वर पोहचली असतांनाच आता पुन्हा रात्रो ९ वाजता एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २५ वर पोहचली आहे. नव्याने आढळलेला कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण हा एटापल्ली तालुक्यातील असून  त्याला  एटापल्ली येथील संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते असे आरोग्य विभागाने कळविले आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याने  नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक कामे वगळता घराबाहेर न पडता घरीच सुरक्षित राहावे असे आवाहन आरोग्य विभाग गडचिरोलीच्या वतीेने करण्यात आले आहे.




  Print






News - Gadchiroli | Posted : 2020-05-25






Related Photos