भामरागड तालुक्यातील तलाठ्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलिसांवर तीन दिवसात कारवाई करावी, अन्यथा लेखणीबंद आंदोलन करणार


- महसूल, पटवारी, कोतवाल संघटनेचा इशारा, तहसीलदार सिलमवार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने नियुक्ती केलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावून घरी परत जात असताना भामरागड तालुक्यातील तलाठ्यांना भामरागड पोलिस स्टेशनच्या समोर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अपमानास्पद व कैद्यांसारखी वागणूक दिली. सदर तलाठ्यांनी पोलिसांना आपली ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केल्यानंतरही काहीही ऐकूण न घेता अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकार अत्यंत निंदनीय असल्याने याकडे गांभिर्याने लक्ष देउन तलाठ्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलिसांवर तीन दिवसांच्या आत कारवाई करावी, अन्यथा तहसील कार्यालय भामरागड येथे 26 मे पासून लेखणीबंद बांदोलन करण्यात येईल, असा इशारा भामरागड तालुका महसूल संघटना, तालुका पटवारी संघटना व तालुका कोतवाल संघटनेने दिला आहे. यासंदर्भात भामरागडचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांच्यामार्फतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले आहे.
तहसील कार्यालय भामरागड यांच्या आदेशाची अंमलबजावणीकरिता तालुक्यातील तलाठ्यांना आदेशित केले आहे. त्यानुसार २१ मे २०२० रोजी रात्री ११.२५ वाजता फाॅरेस्ट चेकपोस्ट नाका येथून आपले कर्तव्य बजावून परत येत असताना चिचोडाचे तलाठी एस. एम. कन्नाके, येचलीचे तलाठी आर. एम. तलांडे, आरेवाडाचे तलाठी आर. एस. मडावी यांना पोलिस स्टेशन भामरागडसमोर ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी सदर तलाठी कर्मचाऱ्यांना कैद्यांसारखी वागणूक देउन अपमानास्पदरित्या वर्तवणूक केली. त्यांना हातवर करून १० मिनिटे गुडघ्यावर रस्त्यावर बसविले व गुडघ्यावर चालविले. सदर तलाठ्यांनी पोलिसांना आपली ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला असतानादेखील त्यांचे काहीही न ऐकता गोळ्या झाडून जीवे मारण्याची व तहसीलदारांसमोर फोडून काढण्याची धमकी दिली. यावेळी तहसीलदार यांच्याशी वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा दूरध्वनी व्यस्त असल्याने भामरागड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात आल्यानंतर त्या पोलिसांनी तलाठ्यांची सुटका केली असल्याचे संघटनांनी निवेदनात म्हटले आहे. अशा प्रकारची घटना यापूर्वीही कोतवाल कर्मचारयांसोबत घडली आहे. तालुक्यात बाहेरील राज्याून व जिल्ह्यातून येणारया लोकांमुळे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशान्वये कोविड १९ अंतर्गत कामाककिरता सर्व विभागातील कर्मचारंयाना आदेशित केलेले आहे. त्यानुसार चेक पोस्टवर महसूल विभाग, आरोग्य विभाग व पोलिस विभाग यांचे संयुक्त पथक २४ तास राहणे अपेक्षित आहे. त्याानुसार सर्व तलाठी व कोतवाल बांधवांना चेक पोष्टवर आदेशित केले आहे व चेकपोष्ट नाक्यांवर इतर विभागाच्या कर्मचारयांना नियुक्त केले असल्याची माहिती पोलिस विभागाला होती. तरीदेखील कर्तव्यावरून परत येत असलेल्या तीन तलाठ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. हा प्रकार निंदनीय आहे. त्यामुळे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर तीन दिवसांच्या आत कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. सदर प्रकाराची गांभिर्याने दखल घेतली न गेल्यास व त्या पोलिसांवर कारवाई न झाल्यास २६ मे २०२० पासून भामरागड तहसील कार्यालय येथे लेखणीबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदार सिलमवार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहेे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-24


Related Photos