वैरागड परिसरातून १ लाख ८५ हजार रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त, ६ आरोपींवर केला गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरात काही इसम अवैधरित्या दुचाकी वाहनाने हातभट्टी मोहाची दारू वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील पथकाने पाळत ठेवून आज, २२ मे रोजी ३.३० ते ५ वाजताच्या दरम्यान १ लाख ८५ हजार रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त करून ६ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. यावरून अवैधरित्या दारू काढणाऱ्यांचे व दारू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. वैरागड परिसरातील काही इसम हातभट्टीवरील मोहाची दारू दुचाकी वाहनाने आरमोरीकडे आणत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरून आज, २२ मे रोजी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सहायक फौजदार दादाजी करकाडे, पोलिस नाईक सुनील पुट्टावार, पोलिस शिपाई मंगेश राऊत, सिद्धेवर बाबर यांनी वैरागड मार्गावरील फाट्यावर पाळत ठेवून संशयित तीन दुचाकी धारकांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मोहफुलाची दारू आढळून आली. सदर दारू व मुद्देमाल असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विनोद हरिदास गुरनुले (३९) रा. देलोडा, कार्तीक लालाजी बोरुले (३५) रा. मानापूर, क्रिष्णा गोपीचंद कांबळे (२२) रा. इंदिरानगर डोंगरी, महेश रमेश कोल्हे (३२) रा. आरमोरी, प्रशांत केशव खोब्रागडे (३२) रा. आरमोरी, राहूल सुरेश तुमसरे (३१) रा. आरमोारी बर्डी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-22


Related Photos