मुंबई येथून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या ४ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पोहचली १३ वर


- जिल्हावासियांमध्ये भीतीचेे वातावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
ग्रीनझोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता दिवसागणित कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असून मुंबई येथून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या आणखी ४ जणांचे अहवाल आज, २२ मे रोजी कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १३ वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून जिल्हावासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांमध्ये कुरखेडा येथील २, चामोर्शी १, गडचिरोली (मुळगाव कोरची) १ अशा एकूण ४ जणांचा समावेश आहे. हे सर्वजण मुंबई येथून आले असून त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याने १७ मे पर्यंत हा जिल्हा ग्रीनझोनमध्ये होता. मात्र १७ मे रोजी रात्री उशिरा एकाच दिवशी ५ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले. त्यानंतर कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून आज, २२ मे २०२० पर्यंत एकूण १३ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गडचिरोली वासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक कामे वगळता घराबाहेर न पडता घरीच सुरक्षित राहावे व आपल्या आणि कुटुबींयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभाग गडचिरोलीच्यावतीने करण्यात आले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-22


Related Photos