स्थानिकांचे जीवनमान सूधारण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना द्या : मंत्री सुनिल केदार


- वडसा येथील वळू माता संगोपन व बदक पैदास केंद्रास पालकमंत्री  ना . विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत भेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक लोकांना अर्थिक पाठबळ उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सूधारण्यासाठी जिल्हयातील दुग्धव्यवसायाला चालना देणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी व्यक्त केले. गडचिरोली येथील वडसा शासकीय यलु माता प्रक्षेत्र व बदक पैदास प्रक्षेत्र येथे भेटीवेळी ते उपस्थित अधिका-यांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी मंत्री सुनिल केदार यांनी संबंधित वळू माता संगोपन व बदक पैदास केंद्राच्या कामांचा आढावा घेतला. ते म्हणाले की वडसा हे राज्य स्तरावरील पशूधन विकास केंद्र म्हणून निर्माण झाले पाहिजे. यातून स्थानिक लोकांना पशूधन व दुग्ध व्यवसायाबाबत चालना मिळून या क्षेत्रात विकास साधण्याची संधी त्यांना उपलब्ध होईल. यावेळी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, उप विभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसिलदार सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य ॲड.राम मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हयाचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी वडसा येथील केंद्रात आवश्यक वातावरण व जागा उपलब्ध असल्याचे मंत्री सुनिल केदार यांच्या निदर्शनास आणले. मग याठिकाणी अजून या केंद्रात सुधारणा करून देशातील सर्वोत्कृष्ट वळू पैदास केंद्र बनविता येईल, एक राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र उभरता येईल असे मत व्यक्त केले. यामुळे शेतक-यांना चांगल्या प्रतीची दुभ्ती जनावरे व त्याबाबतची संगोपन प्रक्रिया याच ठिकाणी पाहता येईल. यासाठी तातडीने आराखडा निर्माण करून शासनास सादर करण्याचे निर्देश त्यांनी पशूसंवर्धन विभागातील अधिका-यांना दिले. वडसाला लागून असलेल्या या केंद्रात ४ तलाव, 6 बोरी तसेच बाजूने पाण्याचा कॅनल आहे. या ठिकाणी चांगला प्रकल्प उभारण्यास आपणाला वाव आहे असे ते म्हणाले. 

पशूधन प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार

पालकमंत्र्यांनी यावेळी वळू माता प्रक्षेत्रावर सद्यस्थितीत उच्च व उत्तम दुग्धोत्पादन असलेल्या देशी सहिवाल गायींची संख्या वाढवुन संवर्धन करण्याचे निर्देश दिले. यासाठी शासनाकडून अजिबात निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी अधिक-यांना सांगितले. यानुसार ताबडतोब परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. प्रक्षेत्रावर पशुपालनाविषयी उच्च दर्जाचे प्रशिक्षण केंद्र पुर्व विदर्भ विभागाकरिता विकसित करण्याबाबत आराखडा तयार करण्यासंदर्भात तातडीने काम हाती घ्या असे सांगून वळु माता प्रक्षेत्राकरीता प्रोजेक्ट रिपोर्ट बनवुन त्यानुसार कार्यावाही करण्याबाबतचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 
वळू माता प्रक्षेत्रावर संरक्षण भिंत बाधण्याकरीता, बल्क मिल्क कुलर, मिल्कींग मशीन, हारव्हेस्टर चारा कटाई करण्याकरीता, बेलिंग मशीन, फ्रिजवाल गायींच्या शेडमध्ये फॉगर सिस्टीम, जनावरांकरीता नविन अत्याधुनिक शेड बांधणे इत्यादी करीता जि. नि. स. गडचिरोली अंतर्गत प्रस्ताव करण्याबाबत पालकमंत्री महोदयांकडुन निर्देश देण्यात आले. 
 मंत्री, सुनील केदार यांनी बदक पैदास प्रक्षेत्रावरील पायाभुत बदक कळप क्षमता ३५० वरुन १००० करण्यात यावी अशा सूचना यावेळी केल्या. बदक पैदास प्रक्षेत्रावर महिन्याला ५००० एकदिवसीय बदक पिल्लांची निर्मीती करण्याचे नियोजन करण्यात येउन प्रक्षेत्राची उत्पादन क्षमता वाढविण्यात यावी असे त्यांनी प्रशासनास निर्देशित केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-22


Related Photos