अम्फान चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बंगालला केंद्राकडून १ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कोलकाता :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  शुक्रवारी पश्चिम बंगालमधील अम्फान वादळामुळे झालेल्या नुकसानीचे  हवाई सर्वेक्षण केले . केंद्राच्या वतीने त्यांनी बंगालला १ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. चक्रीवादळामुळे झालेले नुकसान भरून निघून बंगाल पुन्हा उदयास येईल अशी त्यांना आशा आहे. पीएम मोदी म्हणाले की, या दु: खाच्या घटनेत ते पश्चिम बंगालसोबत आहेत. बंगालवर कोरोना आणि अम्फान या दोन्ही आपत्तींशी एकत्र लढत आहे.
पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान मदत निधीतून चक्रीवादळात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळेल तर जखमींना ५० हजार  रुपयांची मदत जाहीर केली आहे. 'पश्चिम बंगाल कोरोना आणि अम्फान या दोन समस्यांशी लढत आहे. कोरोनाशी लढण्याचा मंत्र म्हणजे जिथे आहे तिथेच रहाने परंतु वादळाचा मंत्र शक्य तितक्या लवकर एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आहे. पश्चिम बंगालला दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया एकाच वेळी लढाव्या लागल्या. पण ममतांना भारत सरकार आवश्यक ती मदत करेल.' असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.  Print


News - World | Posted : 2020-05-22


Related Photos