१५ हजारांची लाच स्वीकारतांना कृषी विभागातील कर्मचारी एसीबीच्या जाळयात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
धान कापणी  यंत्र देण्याकरिता कृषी विभागातील प्रकल्प संचालक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, कारंजा कार्यालय गोंदिया येथील संगणक परिचालक वैभव पुंडलिकराव मुंगले (३४) व रविकांत रावते, सेल्समॅन, माॅडल व ऑटोमोबाईल्स गोंदिया यांना १५ हजार रूपयांची लाच स्विकारल्याने ॲन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने पकडले.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार हे कृषन्नती धान उत्पादन शेतकरी गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे नोंदनीकृत गटामार्फत शासनाकडून स्वंयचलीत धान कापणी यंत्र खरेदी करण्याचे ठराव पारीत करून धान कापणी यंत्र मिळण्याबाबतचा प्रस्ताव येथील संगणक परिचालक वैभव मुंगले यांच्याकडे सादर केला होता. सदर प्रस्तावाबाबत विचारपूस करण्याकरिता तक्रारदार हे प्रकल्प संचालक कार्यालय, कारंजा जि. गोंदिया येथे कार्यरत संगणक परिचालक वैभाव मुंगले यांना भेटले असता त्यांनी तक्रारदाराच गटाला स्वयंचलीत धान कापणी यंत्र देण्याकरिता २० हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची वैभव मुंगले यास लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदविली.
पोलिस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीय रित्या शहानिशा करून सापळा कारावाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणी दरम्यान संगणक परिचालक वैभव मुंगले यांनी तक्रारदारास गटाला स्वयंचलीत धान कापणी यंत्र देण्याकरिता २० हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रूपये लाच रक्कम खासगी इसम रविकांत रावते यांच्याहस्ते स्विकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने पकडले. संगणक परिसचालक वैभव मुंगले व रविकांत रावते यांच्याविरूध्द पोलीस स्टेशन गोंदिया येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अपर पोलीस अधिक्षक राजेश दुदलवार ॲन्टी करप्शन ब्युरो नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलिस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे, स. फौ. शिवशंकर तुंबळे, विजय खोब्रागडे, पो.हवा. प्रदिप तुळसकर, राजेश शेंद्र, ना.पो.शि. रंजीत बिसेन, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, मनापोशि गिता खोब्रागडे, वंदना बिसेन व चालक नापोशि देवानंद मारबते, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांनी केली.  Print


News - Gondia | Posted : 2020-05-22


Related Photos