आज गडचिरोली नगर परिषदेच्या मलनिस्सारण योजना प्लाॅट बांधकामाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत गडचिरोली नगर परिषदेच्यावतीने गडचिरोली शहरातील मलनिस्सारण योजना सिवरेज ट्रीटमेंट प्लाॅन्ट बांधकामाचे भूमिपूजन आज, २२ मे २०२० रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, ओबीसी, बहुजन कल्याण कॅबिनेट मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते तर विशेष अतिथी म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. देवराव होळी तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा योगिता प्रमोद पिपरे, नगर परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, पाणी पुरवठा सभापती वैष्णवी नैताम, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, शिक्षण सभापती रितु कोलते, अर्थ व नियोजन सभापती निता उंदीरवाडे, महिला व बालकल्याण सभापती लता लाटकर, महिला व बालकल्याण उपसभापती माधुरी खोब्रागडे, नगरसेवक मुक्तेश्वर काटवेे व समस्त नगरसेंवक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-22


Related Photos