नक्षलवाद्यांनी कमलापूर गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केली तोडफोड, बॅनर्स बांधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न


- कोरोना लॉकडाऊनमध्येही नक्षल्यांकडून बॅनरबाजी सुरूच, २२ मे पर्यंत जिल्हा बंद पाळण्याचे सोडले फर्मान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी :
जिल्ह्यात सध्या नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला असून धानोरा तालुक्यात कंत्राटदारांच्या चार वाहनांची बुधवारी रात्री जाळपोळ केल्यानंतर आज, २१ मे रोजी पहाटेच्या सुमारास अहेरी तालुक्यातील कमलापूर गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून मुख्य चौकात नक्षली बॅनर्स बांधून २२ मे पर्यंत जिल्हा बंदचे फर्मान सोडले आहे. मागील काही दिवस शांत बसलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकेवर काढत बॅनरबाजी व नक्षल कारवाया सुरू केल्या आहेत. कोरेाना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे भारतासह संपूर्ण जग हादरला असल्याने या महामारीशी सामना करण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे बहुतांशी कामे ठप्प असून नागरिक शांत बसले असतानाही नक्षल कारवाया मात्र सुरूच असल्याने गडचिरोलीसह शेजारच्या जिल्ह्यात व राज्यात नक्षल दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भामरागड तालुक्यात नुकत्याच झालेल्या पोलिस -नक्षल चकमकीत गडचिरोली पोलिस दलातील दोन जवान शहीद झाले. त्यानंतर नक्षल्यांनी आपला मोर्चा कंत्राटदारांच्या वाहनांकडे वळवित रेती वाहतूक करणारया कोट्यवधी रुपये किंमतीच्या चार वाहनांची २० मे रोजीच्या मध्यरात्री जाळपोळ केली आणि आज, २१ मे रोजी पहाटेच्या सुमारास कमलापूर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. तसेच मुख्य चौकात बॅनर्स बांधून त्या माध्यमातून २२ मे पर्यंत जिल्हा बंद पाळण्याचे आव्हान नक्षल्यांनी केले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या कारवाया बघता नक्षल्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-21


Related Photos