बनावट 'ई' पासच्या सहायाने जिल्हा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व बनावट 'ई' पास तयार करणाऱ्या दोन इसमांवर गुन्हा दाखल


- देसाईगंज पोलिसांची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरोना साथरोग विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर साथरोग अधिनियम १८९७ चे तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाची अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून वेळोवेळी शासनाकडून आदेश निर्गमित करण्यात येतात. त्यामध्ये जमावबंदी, जिल्हाबंदी इत्यादी बाबी अंतर्भूत आहेत. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज  पोलस ठाण्याच्या हद्दीतील जिल्हा सीमा ब्रम्हपुरी रोड वैनगंगा नदीच्या पुलाजवळ, लाखांदूर रोड सावंगीमध्ये, अर्जुन रोड फाॅरेस्ट नाक्याजवळ या तीनही मार्गावर नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. आज, २० मे रोजी ब्रम्हपुरी रोड वैनगंगा नदीच्या पुलाजवळ नाकेबंदी दरम्यान एक इसम देसाईगंजकडून ब्रम्हपुरीला जाण्याकरिता एमएच ३३ एल ४२१० या दुचाकीने येताच त्यास गडचिरोली पोलिस दर्लाच्या जवानांनी थांबवून विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव मुकेश दुर्योधन राऊत (३१) रा. जुनी वडसा असे सांगितले. त्याचबरोबर त्याने त्याच्याजवळ 'ई' पास असल्याचे सांगून 'ई' पास दाखविले. पोलिस जवानांना शंका आल्याने जवानांनी 'ई' पास क्युआर ॲन्ड बारकोड स्कॅनर या मोबाईल ॲपवर 'ई' पास चेक केले असता तो बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्याची अधिकची चौकशी केली असता सदर पास हा आरोपीने संतोष बकाराम कोरे (४४) व्हीजन काॅम्पुटर देसाईगंज याच्या दुकानात बनविल्याचे कबूल केले. यावरून आरोपी मुकेश दुर्योधन राऊत (३१) रा. जुनी वडसा, संतोष बकाराम कोरे (४४) रा. हनुमान वार्ड देसाईगंज यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन देसाईगंज येथ भादंविच्या कलम ४१९, ४६५, ४६८, ४७१, ३४, १७७, सहकलम ६६ (सी), (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक रामनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रुपाली बावणकर, पोलिस शिपाई संतोष नागरे, पोलिस नाईक श्रीकांत आलाम, भूमिअभिलेख कार्यालयाचे साळवे, आरोग्य विभागाचे उईके, शिक्षक आर. एम. मेंडे यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप लांडे हे करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-20


Related Photos