चंद्रपुरमध्ये आढळला पुन्हा एक कोरोना बाधित रुग्ण


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपुर :
येथे आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या ३ झाली आहे. चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरातील ५५ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती हा  हैदराबाद येथून आला होता आणि पाच दिवसांपूर्वी त्याच्यासह कुटुंबातील पाच जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून अन्य सदस्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाच्या १६ व १७ मे रोजी कोरोनासंदर्भातील दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. चंद्रपूर शहरातील कृष्णनगर परिसरात हा रुग्ण १ मे रोजीच्या स्वॅब तपासणीत पॉझिटिव्ह ठरला होता. सध्या हा रुग्ण नागपूर येथे कोवीडशिवाय अन्य आजारासाठी वैद्यकीय उपचार घेत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार हा रुग्ण आता कोरोनामुक्त झाला आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-05-20


Related Photos