गडचिरोली जिल्ह्यातील पुन्हा दोघांचा अहवाल आला कोरोना पॉझिटीव्ह : एकूण रूग्ण संख्या आठ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हयात कालपर्यंत सहा कोरोना बाधितांची नोंद होती परंतू आज पुन्हा दोघांचे कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना बाधितांची संख्या आठ झाली आहे. 
यामध्ये नव्याने आढळलेले रूग्ण हे कुरखेडा व चामोर्शी येथील प्रत्येकी एक एक असून त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले होते . यामुळे कुरखेडा येथील वेगवेगळया दोन क्वारंटाईन सेंटरमधील एकुण पाच, चामोर्शी मधील एका क्वारंटाईन सेंटरमधील दोन व आरमोरी येथील शंकरनगर सेंटरमधील एका रूग्णाचा समावेश आहे. या सर्व कोरोना बाधित रूग्णांना जिल्हा रूग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये हलविण्यात आले आहे. संबंधित रूग्णांकडून त्यांच्या प्रवासाचे तपशिल घेणे सूरू असून  संबंधित पॉझिटीव्ह आलेल्या प्रवाशांना आरोग्य विभागाकडून १६ मे रोजी जिल्हयात प्रवेश केल्यापासुन संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे . कोरोनाबाधित रूग्णांची संख्या रोज वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रोज परिस्थितिचा आढावा घेत आहेत.
जिल्हयातील नागरीकांना व बाहेरून आलेल्या प्रवाशांनी अधिक काळजी घेणे आता गरजेचे असून प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आवाहन केले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-20


Related Photos