३४ निष्पाप आदिवासींचा खुन करणाऱ्या सृजनक्कासाठी बंद का पाळायचा


- जिल्हयातील संतत्प नागरिकांचा नक्षलवादयांना सवाल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
या ना त्या कारणाने नक्षलवादी बंद पुकारून सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असतात. आज नक्षलवादयांनी सृजनक्कासाठी बंद पुकरलेला आहे. कसनसुर दलम डीव्हिसी सृजनक्का हिच्यावर जिल्हाभरात विविध पोलीस स्टेशनला एकुण १४४ गंभीर गुन्हयांची नोंद असून यामध्ये ३४ निष्पाप आदिवासी नागरिकांच्या खुनासह जनतेच्या पैशातून उभारलेल्या अनेक शासकीय मालमत्त्तांची जाळपोळ यांचा देखील समावेश आहे. जिल्हयातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिक नक्षलवादयांनी पुकारलेल्या बंदला तिव्र विरोध करत ३४ निष्पाप आदिवासींचा खून करणाऱ्या  सृजनक्कासाठी का म्हणून बंद पाळायचा असा सवालच संतप्त नागरिकांनी नक्षलवादयांना विचारला आहे. जिल्हाभरातील नागरिक बंदला प्रतिसाद देणार नाहीत हे नक्षलवादयांना ठावूक असल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भ्याड नक्षलवादयांनी उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलिस मदत केंद्र सावरगाव हददीतील सावरगाव -मुरूमगाव रोडवर मध्यरात्री एका खासगी व्यक्तीच्या मालकीचे ३  हायवा व १ ट्रक अशा ४ वाहनांची जाळपोळ केली आहे.
गेली अनेक दिवसांपासून गडचिरोली पोलिस दल जिल्हयातील नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक नाविण्यापूर्ण योजना राबवित आहे. तर दुसरीकडे नक्षलवादी सातत्याने जिल्हयातील नागरिकांसाठी शासन करत असणाऱ्या विविध विकास कामांना विरोध करून स्वतःच्या फायदयाासठी नागरिकांच्या सर्वांगीण विकासामध्ये आडकाठी निर्माण करत आहे. गडचिरोली जिल्हयातील अनेक भागांतील नागरिकांना नक्षलवादयांचा दुटप्पीपणा लक्षात आल्याने नागरिक नक्षलवादयांना उघडपणे विरोध करत आहेत. त्यामुळेच नक्षलवादी अशाप्रकारचे कृत्य करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे.
एकीकडे राज्यासह गडचिरोली जिल्हा कोरोना महामारिचा सामना करीत असतांना व या संकटकाळात पोलीस दलाबरोबरच इतर शासकीय कर्मचारी देखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतांना दुसरीकडे याचे काहीही सोययुक्त नसलेले नक्षलवादी बंदच्या नावाखाली नेहमीच झाडे पाडून रस्ता अडवून सामान्य नागरिकांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध करतात. यामुळे नागरिकांना जीवनावश्यक सेवाबरोबरच आरोग्यसेवा पुरविणे अत्यंत गरजेचे असतांनाही नक्षलवादयांनी मात्र सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे चालुच ठेवले आहे. आपण नागरिकांच्या कल्याणासाठी झटत असल्याचे भासवून त्याआडून स्वतःचा फायदा साधणे हेच नक्षलवादी आजपर्यंत करत आलेले आहे. गडचिरोली जिल्हयात आजपर्यंत एकूण ५३३ सामान्य आदिवासी बांधवांचे खून नक्षलवादयांनी केले आहे. यामध्ये निष्पाप २२ महिलांचाही समावेश आहे. बंदच्या नावाखाली नक्षलवादी जनतेच्या पैशातून उभ्या करण्यात आलेल्या जनतेच्या मालमत्तेचे नुकसान नक्षलवादी करून सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असतात. बंदच्या नावाखाली आज नक्षलवादयांनी खासगी व्यक्तीच्या मालकीच्या गाडया जाळून पुन्हा एकदा सामान्य नागरिकांचे आपल्याला काहीही देण घेणे नसल्याची बाब अधोरेखीत केली असून सध्या जिल्हयात सुरू असलेल्या तेंदूपत्ता हंगामाच्या अनुषंगाने जिल्हयात दहशत पसरवून तेंदुपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी उकळणे हा एकच उद्देश नक्षलवादयांचा असल्याचे यातून दिसून येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-20


Related Photos