गडचिरोली जिल्ह्यात १९ मे पर्यंत ६ जण आढळले कोरोना पॉझिटीव्ह : ३९८ संशयित रुग्ण, ३६३ पैकी ३२४ नमुने कोरोना निगेटीव्ह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
भारतासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. परवापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याने हा जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र या जिल्हयाला कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज, १९ मे पर्यंत ६ जण कोरोना पॉझिटीव्ह असून ३९८ कोरोना संशयित रुग्ण आहेत. ३९ जण अजून निरीक्षणाखाली असून त्यांना दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. ३६३ जणांचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ३२४ नमुने कोरोना निगेटीव्ह आले आहेत. अजून ३४ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. आज १९ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४७७०८ प्रवासी आले आहेत. ३६४०७ जणांचा घरीच क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. सध्या ३२६९ प्रवासी घरी क्वारंटाईनमध्ये तर ८०२३ प्रवासी संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. गडचिरोली जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेत अत्यावश्यक कामे वगळता घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-19


Related Photos