चकमकीत क्युआरटी पथकाच्या पोलिस उपनिरीक्षकासह जवान शहीद, तीन जवान जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनिष येमुलवार / भामरागड (अहेरी)
: भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पोयरकोटी - कोपर्शी जगंलात आज, १७ मे रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास झालेल्या चकमकीत क्युआरटी पथकातील एक पोलिस उपनिरीक्षक व एक जवान शहीद झाला आहे. या घटनेत ३ जवान जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सदर जंगल परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.
सकाळी ६ वाजताच्या सुमारास नक्षल्यांविरूध्द शोधमोहिम राबविताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी गोळीबार केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देत असताना पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमाने व पोलीस जवान किशोर आत्राम शहीद झाले आहेत. या चकमकीत पोलिस जवान राजू पुसाली पेनगुंडा (ता. भामरागड), गोंगलु ओकशा (रा. लाहेरी, ता. भामरागड), दसरू कुरसामी (रा. पिटेकसा, ता. भामरागड) हे तीन जवान जखमी झाले आहेेत. जखमी जवानांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले आहेण् या चकमकीत एकही नक्षलवादी ठार झाला नाही. शहीद पोलिस उपनिरीक्षक हे पंढरपूर येथील तर शहीद जवान किशोर आत्राम हे आरेवाडा येथील रहिवासी आहेत. शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांना काही दिवसांपूर्वीच त्यांनी नक्षलविरोधी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीसाठी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले होते. संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे थांबले असताना गडचिरोलीत नक्षल्यांशी मुकाबला करताना दोन विरांनी आहुती दिली आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून नक्षल्यांची दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-17


Related Photos