गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट मागील अनेक दिवसांपासून बंदावस्थेत


- रुग्ण व नातेवाईकांना सोसावा लागतो प्रचंड त्रास, रुग्णालय प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरातील काॅम्पलेक्स परिसरात उभारण्यात आलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट मागील अनेक दिवसांपासून बंदावस्थत आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे रुग्णालय प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे. शासन नागरिकांच्या सोयीसुविधेकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत असते. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट सुरू करण्याबाबत ठोस पाउले उचलल्या जात नसल्याने शासन व प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या रुग्णालयातील लिफ्टअभावी वरच्या मजल्यावर तातडीने रुग्णांना उपचाराकरिता ये- जा करता येत नाही. याकडे आतातरी प्रशासन व आरोग्य विभागाने  गांभिर्याने लक्ष देवून लिफ्ट तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागासह शेजारच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील तसेच शेजारच्या राज्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र येथील जिल्हा सामान्य रुग्णालयच आजारी असल्याचे चित्र दिसून येत आहे. या रुग्णालयात रुग्णाला भरती केल्यानंतर विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. अशावेळी रुग्णांना वरच्या मजल्यावर व खालच्या मजल्यावर ने-आण करण्यासाठी लिफ्टची आवश्यकता असते. मात्र येथील लिफ्ट मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. याकडे आतातरी रुग्णालय प्रशासनाने लक्ष देवून लिफ्ट सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-16


Related Photos