छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा घातपाताचा मोठा कट सुरक्षा जवानांनी उधळला


- ४ आयडी स्फोटकांसह ३ पेट्रोल बॉम्ब जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / दंतेवाडा :
  छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा घातपाताचा मोठा कट सुरक्षा जवानांनी उधळला आहे. दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांना टार्गेट करण्यासाठी माओवाद्यांनी शक्तीशाली स्फोटके रस्त्यावर पेरुन ठेवली होती.
४ आयडी स्फोटकांसह ३ पेट्रोल बॉम्ब जप्त करण्यात आली आहे. आयडीची स्फोटके दोन कुकरमध्ये भरुन त्याला रिमोट जोडण्यात आला होता. तर पेट्रोल बॉम्बही पेरुन ठेवण्यात आले होते. जवानांनी दंतेवाडा जिल्ह्यात सर्च ऑपरेशन करून ही स्फोटके शोधून काढली. सर्व स्फोटके निकामी करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश मिळाल्याची माहिती मिळाली आहे.
बारसूर लगत रस्त्याच्या बांधकामाला सुरक्षा देण्यासाठी ३०० जवान निघाले होते. तत्पूर्वीच शोधमोहीमेत ही स्फोटके सापडली आहेत. आयडीची स्फोटके प्रत्येकी पाच किलोची होती आणि एंटेनाचा वापर करुन रिमोटने स्फोट घडवण्याचा अत्याधुनिक तंत्राचा माओवादी पहिल्यांदा वापर करणार होते. मोठ्या हल्ल्यांची माओवाद्यांची योजना होती. जवानांच्या सतर्कतेमुळे त्यांची उधळली गेली आणि जवानांचे प्राण थोडक्यात बचावले.  Print


News - World | Posted : 2020-05-16


Related Photos